नाशिकसह चार ठिकाणी 'मल्टिपर्पज कॉम्प्लेक्सेस'
रेल्वे स्टेशन्सचा परिसर आता आर्थिक फायद्यासाठी उपयोगात आणण्याचे रेल्वे मंत्रालयाने आता ठरविले आहे. त्यासाठी बहुउद्देशीय कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येणार असून तेथे प्रवाशांना खरेदीही करता येईल. विमानतळावर असलेल्या 'ड्यूटी फ्री शॉप'चाच हा देशी अवतार असेल. पर्यटन व तीर्थाटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून हे करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील नाशिक, मनमाड, नांदेड, शिर्डी या स्थानकांचा समावेश आहे. या मल्टपर्पज कॉम्प्लेक्सेसमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट, बुक स्टॉल, पीसीओ, एसटीडी, फॅक्स, मेडिकल, व्हरायटी स्टोअर्स, भूमिगत पार्किंग असतील. एखाद्या मॉलसारखे त्याचे स्वरूप असेल. याची जबाबदारी रेल भूमी विकास प्राधिकरणाला सोपवली जाईल. या स्टेशनांवर हे कॉम्प्लेक्सेस उभारले जातील. अलीपुरद्वार. अलाहाबाद.आनंदपुरसाहिब.बांसपानी.बीकानेर.बिलासपुर .कटक. दार्जिलिंग. देहरादून. दिग्धा.दुर्ग एर्नाकुलम.गांधीधाम.गंगासागर .घाटशिला. हजूरसाहिब.हुबळी. हैदराबाद. इंदौर. जबलपुर.जम्मू तावी. जसीडीह. झांसी.जोधपुर. कन्याकुमारी.काठगोदाम. कटरा. खजुराहो. मदुराई. मनमाड. म्हैसूर. नादेड. नाशिक.पालाकाडा.पारसनाथ.रायबरेली.रायपुर.राजगीर.रामेश्वरम्.रांची.शिर्डी. सिलचर.तारापीठ.तिरचिरापल्ली.उदयपुर.उज्जैन.बडौदरा. और विशाखापत्तनम1