कोळशा क्षेत्रावर मंदीचा परिणाम नाही- दीक्षित
जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम भारतीय कोळसा उद्योगावर पडला नसल्याने या क्षेत्रात मुळीच नोकर कपात करण्यात येणार नसल्याचे आज साऊथ इस्टर्न कोल फील्ड लिमिटेडचे अध्यक्ष एम पी दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय कोळसा उद्योगात मंदीचा कोणताही परिणाम झाला नसून, या क्षेत्रात आगामी शंभर वर्षांमध्ये मंदी फिरकरणारही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या विविध प्रकल्पांसाठी कर्मचाऱ्यांची गरज असल्याने तूर्तास 581 कर्मचाऱ्यांची भरती कंपनीने केली असून, गेल्यावर्षी 749 कर्मचारी भरण्यात आले असल्याचे ते म्हणाले.