टाटांच्या ब्लॉक क्लोजरने 500 कोटीचा फटका
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने आपल्या जमशेदपूर येथील कारखान्यात अचानक ब्लॉक क्लोजर जाहीर केल्यानंतर टाटांच्या सहाय्यक कंपन्यांनाही टाळे लागले असून, या कंपन्याही बंद पडल्याने 500 कोटीचा फटका या उद्योगांना बसल्याचे बोलले जात आहे. ट्रक, डंपर, आणि इतर अन्य वाहन बनवणाऱ्या टाटा मोटर्सचे काम थांबल्याने लघु उद्योजकांचे मोठे नुकसान झाल्याचे या उद्योजकांच्या संघटनेचे अध्यक्ष एस एन ठाकुर यांनी स्पष्ट केले आहे.टाटांनी कालच या कंपनीत ते 25 ते 29 तारखेपर्यंत ब्लॉक क्लोजर जाहीर केले. यानंतर कंपनीच्या सहाय्यक कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना सुटी जाहीर केली असून, आता या कंपन्या 1 डिसेंबर रोजीच सुरू होतील असे ठाकुर यांचे म्हणणे आहे.