शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By भाषा|

भारतालाही बसेल मंदीचा फटका- स्वराज पॉल

भारतीय बाजारपेठांमध्ये आर्थिक मंदीचा परिणाम दिसून येत नसला तरी आगामी काळात भारतीय बाजारालाही आर्थिक मंदीचा मोठा फटका बसेल अशी भीती अप्रवासी भारतीय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांनी व्यक्त केली आहे.

आशियातील श्रीमंतांच्या यादीत पॉल यांचे नाव अग्रक्रमावर आले असून, त्यांची संपत्ती 1.5 अब्ज पौंडांपर्यंत झाली आहे. गेल्या दोन वर्षात आपण 22 कंपन्यांचे अधिग्रहण केले असून, भारतात 1994 पासून आतापर्यंत 32 कंपन्या स्थापण्यात आल्याचे पॉल यांनी स्पष्ट केले आहे.

आर्थिक मंदीचा फटका भारताला बसला नसल्याचे बोलले जात असले तरी आगामी काळात भारतीय बाजारावरही याचा परिणाम दिसून येईल असे पॉल म्हणाले.