शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By वार्ता|
Last Modified: अहमदाबाद , मंगळवार, 25 नोव्हेंबर 2008 (18:22 IST)

वस्रोद्योगासाठी सरकारचे 'बेल आऊट'

वस्रोद्योगात आलेल्या मंदीचा सर्वांनी एकजूटीने सामना करणे गरजेचे असून, ही मंदी फारकाळ टिकणार नसल्याचे मत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी व्यक्त केले आहे.

पुढील वर्षांपर्यंत या क्षेत्रात पुन्हा एकदा वाढ दिसून येणार असल्याचे भाकीतही त्यांनी या प्रसंगी केले. वस्रोद्योग क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी 300 ते 2 हजार कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.

जागतिक मंदीमुळे वस्रोद्योगातील पाच लाखांवर कर्मचारी बेकार होण्याची भीती व्यक्त करतानाच निर्यातीवरही याचा परिणाम होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.