शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By भाषा|

आता विक्रम पंडितांचीच गच्छंती?

NDND
जागतिक मंदीचा फटक्याने शेअर बाजारात गटांगळ्या खात असलेल्या सिटी ग्रुपने आता आपले मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पंडीत यांचीच गच्छंती करण्याचे ठरवल्याचे कळते. मुळचे मराठी असलेले पंडित गेल्याच वर्षी बॅंकेचे सीईओ बनले होते. कठीण परिस्थितीतून बॅंकेला ते बाहेर काढतील या आशेने त्यांना या पदावर नेमण्यात आले होते.

सिटीग्रुपला वाचविण्यासाठी सध्या वेगवान हालचाली सुरू आहेत. सरकारी मदत घेणे किंवा बॅंकेचा काही व्यवसाय इतर बॅंकांना विकणे हा त्यांच्यासमोरचा पर्याय आहे. याचसंदर्भात सध्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. अनेक पर्याय विचारात घेतले जात आहेत. विक्रम पंडितांची हकालपट्टी करण्यापासून ते अगदी संपूर्ण बॅंक अथवा तिचा काही भाग विकण्यापासूचे पर्याय आजमावले जात आहेत.

बॅंकेला या कठिण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पन्नास ते शंभर अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. पण यापुढे काय कृती केली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विक्रम पंडितांचा प्रवास
श्री. पंडित जगातीसर्वांमोठबॅंअसलेल्यसिटग्रुपचगेल्या वर्षमुख्कार्यकारअधिकारी (सीईओ) बनले. सोळाव्यवर्षअमेरिकेशिकण्यासाठगेलेल्यपंडीतांनउच्शिक्षघेऊतिथेकारकिर्दीचश्रीगणेशकेलआणि मॉर्गस्टॅन्लेसारख्यमोठ्यकंपन्यांमध्यकाकरअखेसिटग्रुपच्यसीईओपदापर्यंतचटप्पगाठला. शेगावच्यगजानमहाराजांवनितांश्रद्धअसणारपंडीएवढ्यमोठ्यपदावअसलतरमनाननिखमराठआहेत.