जनरल मोटर्स दिवाळखोरीकडे?
आर्थिक मंदीचा विळखा अमेरिकेत वाढत असून, अमेरिकेतील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या जनरल मोटर्सनेही आता आपण दिवाळखोरीत निघाल्याचे मान्य केले असून, लवकरच कंपनी याची घोषणा करण्याची शक्यता आहे. अमेरिकन प्रसार माध्यमांनी आज याविषयीचे वृत्त प्रकाशित केले असून, कंपनीतील संचालक मंडळात याविषयी मतभेद असल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे. अमेरिकेत सध्या जबरदस्त आर्थिक मंदी असून, अनेक कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. कंपनीने दिवाळखोरी जाहीर करू नये म्हणून संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू असून, शेवटचा पर्याय म्हणून कंपनी दिवाळखोरी जाहीर करू शकते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.