जागतिक गुंतवणूक परिषद रद्द
जागतिक आर्थिक संकट अधिक गडद होत असल्याने कर्नाटक सरकारने 15 आणि 16 जानेवारीला आयोजीत करण्यात आलेली जागतिक गुंतवणूक परिषद रद्द करण्याची घोषणा आज केली. आर्थिक मंदीचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला असून, या संमेलनासाठी उपस्थित राहण्यास अनेक देशांच्या प्रतिनिधींनी असमर्थता दर्शवल्याने ही परिषद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री येदुयरप्पा यांनी स्पष्ट केले आहे. तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा याविषयी समीक्षा केली जाणार असल्याचे ते म्हणाले.