शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , रविवार, 23 नोव्हेंबर 2008 (12:31 IST)

जेट एअरवेजचे कर्मचारी पुन्‍हा अडचणीत

जेट एअरवेजच्या 1900 कर्मचा-यांना कामावरून काढून टाकल्‍यानंतर झालेल्‍या वादावर पडदा पडतो न पडतो तोच पुन्हा कर्मचा-यांना एका नव्‍या संकटाचा सामना करावा लागणार आहे. जेटच्या व्‍यवस्‍थापनाने मंदीच्‍या पार्श्‍वभूमीवर कर्मचा-यांच्या पगारात 20 टक्के कपात करण्याचं धोरण अवलंबले आहे.

यासाठी जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांनी पायलट, इंजिनिअर आणि अन्य अधिकाची रविवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत व्‍यवस्‍थापनाच्‍या निर्णयावर कर्मचा-यांची मते जाणून एकत्रितपणे निर्णय घेतला जाणार आहे. गेल्‍या वर्षभरापासून जेट एअरवेजला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्‍यावर मात करण्‍यासाठी पावले उचलली नाहीत तर यापुढे कंपनी चालवणे कठीण होईल अशी व्‍यवस्‍थापनाची भूमिका आहे.