रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 मार्च 2020 (10:55 IST)

पिंपरी-चिंचवड: नराधमांकडून 13 वर्षीय मुलीचा विनयभंग

पिंपरी-चिंचवड येथे एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तीन नराधमांनी तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून अन्य दोन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. घटनेनंतर त्यांनी पळ काढला आहे.
 
पीडित मुलगी एका दुकानात प्रोजेक्टसाठी काही पेपर्स घेण्यासाठी गेली होती. परत येत असताना नराधमांनी तिला रिक्षात ओढले. तिला जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग करत चालत्या रिक्षातून ढकलून देण्यात आले. घडलेला प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितल्यावर त्यांनी पोलिस स्टेशन गाठलं. 
 
या प्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्ह दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली असून अन्य दोघांचा शोध घेयला सुरुवात केली आहे.