गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (09:45 IST)

महाराष्ट्रात पूर आणि भूस्खलनात 207 ठार, अनेक बेपत्ता

मंगळवारी पूरग्रस्त महाराष्ट्रात मृतांचा आकडा 207 झाला आणि कोयना धरणातून पाणी सोडल्याने लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी जावे लागले.
 
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात विशेषत: किनारपट्टी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात भीषण पूर आणि मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मृत्यू झालेल्या 207 लोकांपैकी जास्तीत जास्त 95 जण रायगड जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर सातारा येथे,45,रत्नागिरीत,35,ठाण्यात12,कोल्हापुरात सात, मुंबई उपनगरात चार, पुण्यात 3, सिंधुदुर्ग, वर्धा आणि अकोला जिल्ह्यात प्रत्येकी एक मृत्यू झाला. निवेदनात म्हटले आहे की, 11 लोक अद्याप बेपत्ता आहेत तर 51 लोक जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
बहुतेक मृत्यू रायगड,सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे झाले, तर कोल्हापूर आणि सांगलीतील पुरामुळे जीव गेला,असे निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्रात १ जूनपासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये 294 जणांचा मृत्यू झाला आहे.आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्रामुख्याने दुर्गम भाग व अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे बचावकार्य वेगात करण्यासाठी स्थानिक अधिकारी धडपडत आहेत आणि पावसाचा परिणाम त्यांच्या कार्यावर होत आहे.
 
निवेदनात म्हटले आहे की, 29,100 जनावरेही ठार झाली आहेत, बहुतेक सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. पावसाने सह्याद्रीच्या पर्वतावर,पश्चिम घाटाचा काही भाग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे प्रशासनाला अधिकाधिक लोकांना बाहेर काढण्यात आले .आतापर्यंत 3,75,178 लोकांना हलविण्यात आले असून त्यापैकी 2,06,619 एकटे सांगलीतील आहेत.

उल्लेखनीय आहे की सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला नाही, परंतु सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून जास्तत पाणी सोडल्यामुळे सांगली शहर व अनेक गावे पूरपाणी झाली. धरण कृष्णा नदीच्या उपनद्या असलेल्या कोयनावर बांधले गेले आहे. निर्वासित लोकांसाठी 259 मदत शिबिरं स्थापन करण्यात आली असून त्यातील 253 कोल्हापुरात आणि 6 रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.