शनिवार, 1 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 8 डिसेंबर 2021 (09:32 IST)

बुलडाणा : चालकाची झोप भक्तांना महागात, टेम्पो उलटला, 35 जण जखमी

जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी आणि परिसरातील भाविक दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर घराकडे येत असताना झोप आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि मेटाडोर रोडवरील दुभाजकावर गेले. 
 
पंढरपूरवरुन दर्शन घेऊन परतणाऱ्या बुलडाण्यातील मेरा खुर्द फाट्याजवळ भाविकांच्या टेम्पोला भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. चालकाला डुलकी लागल्यामुळे दुभाजकावर आदळून हा टेम्पो उलटला. या अपघातात किमान 35 प्रवासी जखमी झाले आहेत.  
 
बुलडाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्यातील खांडवी येथील मेटाडोरचे चालक मालक असलेले अनिल गणेश आणि विकास गणेश हे गावातील, तसेच परिसरातील 35 ते 40 महिला – पुरुष भाविक भक्तांना दर्शनासाठी पंढरपूर येथे घेऊन गेले होते.
 
मंगळवारी दर्शन घेऊन घराकडे परत येत असताना चालकाला डुलकी लागली. त्यामुळे भक्तांनी भरलेली गाडी रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळून पलटी होऊन अपघात घडला. या अपघातात 20 जण किरकोळ, तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना जालना-चिखली रस्त्यावरील मेरा खुर्द फाट्याजवळ घडली आहे.
 
चालकाच्या लक्षात येताच त्याने लगेच गाडीचे ब्रेक लावले. त्यामुळे गाडी विरुद्ध दिशेने वळून रोडवर पलटी झाली. मेटाडोर उलटल्यामुळे गाडीतील 35 ते 40 भक्तांना मार लागला. काही जणांची दुखापत किरकोळ स्वरुपाची होती, तर काही भाविकांना गंभीर जखमा झाल्या.