बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जानेवारी 2019 (09:39 IST)

तयारी परीक्षेची : १० वी चे ऑनलाईन प्रवेशपत्र वाटप सुरु

मार्च महिन्यात इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बुधवार (दि. ३०) पासून दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार उद्यापासून ऑनलाईन प्रवेशपत्र मिळणार आहेत. माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रांचे वाटप केले जाईल. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमार्फत ऑनलाईन प्रवेशपत्र दिली जाणार आहेत. मंडळाच्या संकेतस्थळाववरील स्कुल लॉगिन मधून शाळांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी याबाबत सर्व संबंधित माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापकांना कळविले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, अशा स्पष्ट सुचना मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. 
 
प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरूस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन कराव्या लागणार आहेत. प्रवेशपत्रावरील छायाचित्र, स्वाक्षरी,विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदभार्तील दुरूस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. छायाचित्र सदोष असल्यास तिथे संबंधित विद्यार्थ्याचे  छायाचित्र चिटकवून मुख्याध्यापक स्वाक्षरी करतील. विद्यार्थ्याकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळेकडून पुन्हा प्रिंट काढून दिले जाईल. मात्र, त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देण्यात येणार आहे.