शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (22:21 IST)

तरुणीवर अत्याचार, पिडीताने दिला अपत्याला जन्म ; गुन्हा दाखल

जळगावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर गेल्या ४ वर्षापासून अत्याचार करत त्याच अत्याचारातून पिडीतीने एका मुलाला जन्म दिल्याचे प्रकार समोर आला आहे. अजय राजू भालेराव असे संशयित तरुणाचे नाव आहे. दरम्यान, त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत असे की, शहरातील एका १९ वर्षीय तरुणीचे परिसरात राहणाऱ्या अजय भालेराव या तरूणाशी २०१७ मध्ये ओळख  झाली. नंतर तिच्याशी जवळीक साधत लग्नाचे आमिष दाखवत त्याने अत्याचार करण्यास सुरूवात केली. अजय भालेराव हा विवाहित असून त्याने जुलै २०२१ पर्यंत अत्याचार केला. यात तरूणी गर्भवती राहून तिने एका अपत्याला जन्म दिला.
 
लग्नासाठी विनवणी करूनही अजय भालेराव याने लग्नास नकार दिला. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन बुधवारी रात्री ७ वाजता भालेराव याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस  उपनिरीक्षक राजेश शिंदे तपास करीत आहेत.