शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2019 (09:29 IST)

१ जून ते ३१ जुलै मासेमारीला बंदी

पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या काळासाठी राज्याच्या सागरी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांद्वारे मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही, असा आदेश राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने जारी केला आहे.
 
बंदी कालावधीत यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे पकडण्यात आलेले सर्व मासे जप्त करण्यात येणार आहेत. बंदी कालावधीमध्ये सागरी क्षेत्रामध्ये यांत्रिक मासेमारी नौकेच्या चलनवलनास पूर्णत: बंदी राहील. मासेमारी करताना यांत्रिक नौकेस अपघात झाल्यास शासनाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाई  मिळणार नाही.