बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2019 (16:51 IST)

मुख्यमंत्री मदत निधीलाच मदतीची गरज

सध्या मुख्यमंत्री मदत निधीच्या खात्यातच पैसा शिल्लक नसल्याने त्यालाच मदत हवी आहे. गरीबांना उपचारांसाठी तातडीने निधी पुरवण्यासाठीही या खात्यात पैसा शिल्लक राहिलेला नाही. तातडीने उपचारांची गरज असलेल्या सुमारे ४,००० रुग्णांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीली सध्या १०० कोटी रुपयांची गरज आहे. मुख्यमंत्री मदत निधीच्या वैद्यकीय मदत केंद्राकडे सध्या ४,००० गरीब रुग्णांनी नोंदणी केली आहे. तर केवळ मुंबईतूनच १५०० रुग्ण मदतीसाठी वेटिंगला आहेत. या रुग्णांवर उपचारांसाठी सुमारे १०० कोटी रुपयांची गरज आहे. अशा प्रकारे पहिल्यांदाच मुख्यमंत्री मदत निधीतील पैसा संपला आहे. वाढत्या मदतीच्या अर्जांमुळे निधीची कमतरता भासत आहे.