मुलाचं अपहरण, खंडणीमध्ये मागितले मुंडके

crime news
Last Modified शुक्रवार, 11 जून 2021 (16:40 IST)
नागपुरात अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 15 वर्षीय विद्यार्थ्यांच अपहरण करुन त्याची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. आणि त्याहून विचित्र प्रकार म्हणजे आरोपीने खंडणी म्हणून मृतक मुलाच्या काकाचं मुंडकं कापून त्याचा फोटो व्हॉट्सअप मेसेज वर पाठवण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यानं अपहरणाच्या दोन तासांच्या आत मुलाची हत्या करण्यात आली आहे.
राज पांडे या 15 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. आरोपीनं हत्या करुन रिंगरोड परिसरात राज याचा मृतदेह फेकला आहे. आरोपीने मुलाच्या खंडणीसाठी एका व्यक्तीच्या मुंडक्याची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्याने आरोपीने राज पांडेची हत्या केली आहे.

नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरामाता नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सूरज शाहू असं आरोपीचं नाव आहे. अपहरणकर्त्याने खंडणीकरता मुलाच्या काकाचे शीर मागितले होते. राज पांडेच्या पालकाकडे अशी मागणी फोनवर केली होती. यानंतर काकाच्या मुंडक्याचा फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवा आणि मुलाला सोडवा अशी अजब मागणी आरोपीने केली होती. सध्या सूरज शाहू एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात आहे। पुढील तपास सुरु आहे.
आरोपीने क्रिकेट खेळायला गेलेल्या राजचे दुचाकीस्वाराने गुरुवारी सायंकाळी 6 च्या सुमारास अपहरण केले. मुलगा घरी परतला नाही म्हणून घरच्या मंडळीने पोलीस ठाण्यात तक्रार केली.

मृतक मुलाच्या काकावर असलेल्या रागातून आरोपीने राज पांडे या मुलाचं अपहरण केलं आणि आरोपीने घरी फोन करुन मृतकाच्या काकाचं मुंडकं कापून फोटो पाठवण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन तासांत मुलाची हत्या केली गेली.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

रिलायन्सच्या जागतिकीकरणाची घोषणा CMD मुकेश अंबानी यांनी ...

रिलायन्सच्या जागतिकीकरणाची घोषणा CMD मुकेश अंबानी यांनी केली, Aramcoचे चेअरमेन यांना कंपनी बोर्डात सामील करण्यात आले
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (Reliance AGM 2021) अध्यक्ष व ...

इंग्लंडमध्ये कोरोनाचे प्रकरण वाढले, बीसीसीआय भारतीय ...

इंग्लंडमध्ये कोरोनाचे प्रकरण वाढले, बीसीसीआय भारतीय संघाच्या सुट्या रद्द करू शकतो
न्यूझीलंडला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद हरवल्यानंतर भारतीय संघासाठी आणखी एक ...

अजित पवारांची सीबीआय चौकशी करा, भाजप प्रदेश कार्यकारिणीत ...

अजित पवारांची सीबीआय चौकशी करा, भाजप प्रदेश कार्यकारिणीत ठराव मंजूर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा असा भाजप प्रदेश कार्यकारिणीत ठराव ...

Strawberry Moon 2021 आज आकाशात अद्भुत दृश्य दिसेल, ...

Strawberry Moon 2021 आज आकाशात अद्भुत दृश्य दिसेल, स्ट्रॉबेरी मून उदयास येईल
आज संध्याकाळी सूर्य मावळताच चंद्र उदयास येईल, पण दृश्य भिन्न असेल. या दृष्टीस स्ट्रॉबेरी ...

12वी चा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणार

12वी चा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणार
सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य मंडळांना दहावीच्या आत बारावीच्या परीक्षेचे अंतरिम ...