शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जुलै 2022 (15:24 IST)

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटनासाठी गर्दी,17 हजार 848 पर्यटक नॅशनल पार्कमध्ये

bird park
आठवडाभर मुसळधार बरसणाऱया पावसाने आज थोडी उसंत घेतल्याने तसेच रविवारच्या सुट्टीची संधी साधत अगदी आबालवृद्धांपर्यत पर्यटकांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे कूच केले. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पर्यटकांचे जथेचे जथे पार्कात येतच होते. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून निसर्गाचे सोंदर्य आणि मनाला तृप्त करणाऱया तेथील वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी जवळपास नऊ हजार 984 पर्यटकांनी नॅशनल पार्कमध्ये हजेरी लावली.

तरुण-तरुणींच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले होते. ट्रेकिंग, सायकलिंग करण्यावर पर्यटक विशेष पसंती देताना दिसले. नॅशनल पार्कचे गेट ते कान्हेरी गुंफापर्यंत जाणारे रस्ते चालत जाणाऱया पर्यटकांनी दुतर्फा भरलेले होते. निसर्गाच्या कुशीतून वाहणाऱया ओढय़ामध्ये बसून मनसोक्त भिजताना बच्चे कंपनी व आबालवृद्धांनी धम्माल मस्ती केली. काहींनी घरूनच बनवून आणलेल्या खाद्यपदार्थांवर ओढय़ाच्या कडेला गवताच्या गालिचावर बसून आडवा तिडवा हात मारला.
 
सहा दिवसांत 18 हजार पर्यटक
गेल्या सहा दिवसांत 17 हजार 848 पर्यटक नॅशनल पार्कमध्ये आले होते. यामुळे 16 लाख 34 हजार 118 रुपयांचा महसूल जमा झाला आहे.