'एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद भाजपमुळेच गेले,' संजय राऊत यांचा सामनातून गौप्यस्फोट

sanjay raut
Last Modified रविवार, 26 जून 2022 (10:45 IST)
"शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हुकले ते फक्त भाजपने शब्द फिरवल्यामुळेच. तोच भाजप त्यांना महाशक्ती वाटत आहे", असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी

म्हटलं आहे.

राऊत लिहितात, "एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे. अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचं अस्तित्व टिकून आहे. आमदार येतात व जातात. पक्ष संघटना ठाम असते. श्री. शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. ते नक्कीच झाले असते, पण त्यांचे मुख्यमंत्रिपद कोणी रोखले? महाराष्ट्रात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे.

"शिवसेनेचे चाळीसच्या आसपास आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले. ते आधी सुरतला जाऊन राहिले. नंतर गुवाहाटीला पोहोचले. या सगळ्यांचे नेतृत्व शिंदे करत असले तरी या नाट्याचे खरे सूत्रधार भाजपचे दिग्दर्शक आहेत," हे शिंदे यांनीच उघड केले.
"भाजपची महाशक्ती आपल्या पाठीशी आहे अशी कबुलीच त्यांनी दिली. सुरतमधील 'ला मेरेडियन' हॉटेलात शिवसेना आमदारांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील भाजपचे लोक उपस्थित होते. गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा फुटीर आमदारांच्या सरबराईसाठी वापरण्यात आली," असं राऊत यांनी म्हटलंय.

"सुरतवरून हे बिऱ्हाड खास विमामाने आसामची राजधानी गुवाहाटी येथे हलवण्यात आले. आसामच्या भाजप सरकारने या बिऱ्हाडाची सर्व व्यवस्था केली. या सर्व प्रकरणाशी जर भाजपचा संबंध नव्हता, हा शिवसेनेचा अंतर्गत मामला होता, तर मग या बिऱ्हाडाची इतकी कडेकोट व्यवस्था कारण काय?," असा सवाल संजय राऊत यांनी केला.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

धार्मिक कार्यक्रमात सिगारेट उघडपणे ओढत अश्लील हावभाव असलेला ...

धार्मिक कार्यक्रमात सिगारेट उघडपणे ओढत अश्लील हावभाव असलेला डान्स विडीओ व्हायरल
कोल्हापुरातील तरुण मंडळाच्या धार्मिक कार्यक्रमात अश्लील हावभाव असलेला डान्स विडीओ व्हायरल ...

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी उपस्थित केले ...

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी उपस्थित केले 'हे' प्रश्न
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती ...

हाय-टेक सिक्युरिटीसह Moto G32 ची आज पहिली विक्री,वैशिष्ट्ये ...

हाय-टेक सिक्युरिटीसह Moto G32 ची आज पहिली विक्री,वैशिष्ट्ये जाणून घ्या
Motorola च्या हाय-टेक सुरक्षा वैशिष्ट्यासह Moto G32 स्मार्टफोनची आज भारतात पहिली विक्री ...

Edible Oil Price : खाद्यतेल आणखी स्वस्त होणार !

Edible Oil Price : खाद्यतेल आणखी स्वस्त होणार !
वाढत्या महागाई दरम्यान सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...

FIFA : FIFA ने भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबित केले

FIFA : FIFA ने भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबित केले
जगातील सर्वात मोठी फुटबॉल संघटना म्हणजेच FIFA ने मंगळवारी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ ...