सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (08:00 IST)

केरळमधून पुण्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य

पुण्यात दिवसेंदिवस करोना संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने केरळमधून पुण्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. या संदर्भात महापालिका कार्यालयातून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
 
केरळ राज्यातून पुणे शहरात येणार्‍या प्रवाशांना त्यांच्या आगमनाबद्दल आरटीपीसीआर चाचणी अहवाल सादर करावा लागणार आहे. ज्या प्रवाशांची ही चाचणी निगेटीव्ह आहे त्यांना त्यांच्या इच्छित स्थानी जाण्याची परवानगी असेल तर इतरांना प्रक्रियेनुसार अलगीकरणात अथवा विलगीकरणात ठेवणे आवश्यक असेल.
 
राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात प्रवेश करतांना केरळमधील प्रवाशांना कोविड -१९ निगेटीव्ह अहवाल आणणे अनिवार्य केले आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी आगमना अगोदर ७२ तासांच्या आत करणे अनिवार्य असेल.