1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (09:08 IST)

नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात इन्स्टिट्युट

devendra fadnavis
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात इन्स्टिट्युट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन तयार करणार, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
 
नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात इन्स्टिट्युट
माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगोसबत बैठक झाली. आयोगाचे सीईओ आणि सर्वजण उपस्थित होते. बैठकीचे कारण म्हणजे, नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात इन्स्टिट्युट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन तयार करणे. बैठकीत राज्याकडून प्रेजेंटेशन सादर केले. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीला तत्वतः संमती दाखवली आहे. अशाप्रकारची इंन्स्टिट्युट आम्ही तयार करू, लवकरच यावर मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊ,' असं फडणवीस म्हणाले.