बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (07:29 IST)

सिरममध्ये लागलेल्या आगीचा तपास गुन्हे शाखेकडे

सिरममध्ये लागलेल्या आगीचा समांतर तपास गुन्हे शाखा करत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. सिरममध्ये आगलेल्या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सिरमच्या नवीन इमारतीमध्ये गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. 
 
रामा शंकर हरिजन, बिपीन सरोज (दोघे रा. उत्तरप्रदेश), सुशिल कुमार पान्डे (रा. बिहार), महेंद्र इंगळे आणि प्रतिक पाशेटे (दोघे रा.पुणे) अशी आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. सिरममध्ये आग नेमक्या कोणत्या कारणामुळं लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतची माहिती घेण्याचं काम युध्दपातळीवर चालू आहे. दरम्यान, प्रकरणाचा तपास हडपसर पोलिस करीत असले तरी गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा करीत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.