मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 जानेवारी 2019 (17:15 IST)

पबजी गेमवर बंदी घाला, लहानग्या मुलाचे सरकारला पत्र

राज्यातील एका मुलाने पबजी हा गेम तरुणांसाठी घातक असल्याचे सरकारला पत्र लिहले आहे. अहाद असे त्याचे नाव असून तो केवळ ११ वर्षांचा आहे. पबजी गेममुळे लहान मुले आणि तरुणांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून पबजी गेमवर बंदी घाला, असेही त्याने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात अहादने, ४ पानांचे पत्र लिहून सरकारला पाठवले. या पत्रात त्याने पबजी गेमवर बंदी घाला, अशी मागणी सरकारकडे केली.

कारण, हा गेम हिंसा, सायबर गुन्हेगारी आणि गुंडगिरीला प्रोत्साहन देणारा ठरु शकते. सरकारने हा विषय गंभीरपणे न घेतल्यास याचे भयंकर परिणाम आपणास दिसू लागतील. पबजी हा गेम केवळ खेळण्यासाठी मर्यादित नसून, यात बऱ्याच नकारात्मक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चोरी करणे, खून करणे यावर संपूर्ण गेम अवलंबून आहे, असे त्याने पत्रात लिहिले आहे. हे पत्र केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण ७ जणांना पाठवण्यात आले आहे.