गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (15:58 IST)

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला हा निर्णय

vidhyapith
विद्यापीठाचा दि. 07 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित एकविसावा दीक्षान्त समारंभ स्थगित करण्यात आला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहिर करण्यात आला आहे यामुळे सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 07 फेब्रुवारी 2022 रोजी ऑनलाईन पध्दतीने संपन्न होणार होणार होता. राष्ट्रीय दुखवटयामुळे दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाची पुढील तारीख कळविण्यात येईल असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, या अनुषंगाने सर्व संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना सूचीत करावे.