शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (07:22 IST)

प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे…मौलाना मुफ्ती फईम यांचे आवाहन..

देशात सर्वत्र ‘आजादी का अमृत महोत्सव‘ या योजनेअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन देशपातळीवर करण्यात आल्यानंतर या आवाहनाला प्रतिसाद देत या मोहिमेत देशवासीय सहभागी झाले आहे..आज नाशिकच्या नांदगाव येथील जामा मस्जिद ( मरकज ) येथे नमाजावेळी तमाम मुस्लिम बांधवांना प्रत्येक घरावर, दुकानावर तिरंगा लावण्याचे आवाहन केले..मौलाना मुफ्ती मोहम्मद फईम यांनी यावेळी प्रबोधन करतांना देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलिदान दिलेल्या शहिदांचे स्मरण करून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत ‘आजादी का अमृत महोत्सव‘उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले.. नमाज पठनानंतर प्रत्येक मुस्लिम बांधवांना राष्ट्रध्वज वाटण्यात आले..