शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (08:10 IST)

आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ताटं वाजवल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली. देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूला पंतप्रधान मोदींच जबाबदार आहेत. मोदी माध्यमांसमोर यायला घाबरतात. एकदाही ते माध्यमांसमोर आले नाहीत. फक्त मतदानाच्या वेळी समोर येतात आणि मतदान मागतात, त्यांना लाजही वाटत नाही, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी  पंतप्रधानयांच्यावर टीका केली आहे. 
 
पंतप्रधान मोदी यांचं भूत सध्या वोटिंग मशीनमध्ये जाऊ बसलं आहे. हाताला मतदान केलं तर ते भाजपला जातं. त्यामुळे आधी शिक्का मारुन केलं जाणारं मतदानंच योग्य होतं. बॅलेट पेपर परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. त्याचबरोबर मतदान प्रक्रियेत बदल करण्याचे संकेतही दिले आहेत.
 
सोलापूर जिल्ह्यासाठी असणाऱ्या उजनी धरणातील पाणी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या मतदार संघातील 22 गावांसाठी नेल्याचा आदेश काढल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात येत होता. त्या अनुषंगाने प्रणिती शिंदे यांनी  पत्रकार परिषद घेवून ‘प्राण जाये पर पाणी न जाये’, ही भूमिका त्यांनी घेतली होती. सोलापूरच्या हक्काचे एक थेंब देखील पाणी नेऊ दिलं जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका प्रणिती शिंदे यांनी घेतली होती.