'आमदार-खासदार गेले, तरी शिवसैनिक शिवसेनेसोबतच'- संजय राऊत

Last Modified शनिवार, 2 जुलै 2022 (13:41 IST)
"मुंबई महाराष्ट्रापासून भाजपला तोडायचीय. मुंबईवरची शिवसेनेची ताकद त्यांना नष्ट करायचीय. त्यासाठी तुम्ही (शिंदे गट) तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली दिलीय. मुंबईत शिवसेनेचा पराभव घडवून आणण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री केलंय," असं संजय राऊत म्हणाले.

"शिवसेनेच्या खासदारांच्या बैठक झाली. मी त्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. कारण त्याच वेळेला भाजपच्या एका शाखेनं (ईडी) बोलावलं होतं. मी नव्हतो, पण माझ्याकडे माहिती आली. खासदारांच्या भावनांवर चर्चा झाली. चर्चा होते, पण याचा अर्थ खासदार गेले असे होत नाही," असंही राऊत म्हणाले.

आमदार-खासदार गेले, तरी शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांवर बोलताना संजय राऊत म्हणाले, "कुणाला आनंद होईल का? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असताना, दुसऱ्या क्रमांकाचं पद दिलं जातं आणि तेही जे मुख्यमंत्री झालेत, ते त्यांच्या मंत्रिमंडळात ज्युनियर मंत्री होते. पण भाजपमध्ये शिष्ट आणि आदेश यांचं पालन केलं जातं. त्यानुसार ते वागलं. त्यांचं कौतुक त्यासाठी,"
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी मिळून सरकार पुढे न्यावं. भारतीय जनता पार्टीबरोबर शिवसेनेतून फुटलेल्या गटाचं राज्य आलेलं आहे. जिथे ठाकरे तिथे शिवसेना असं आम्ही मानतो. असं विधान शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

ते म्हणे, "एकनाथ शिंदेंच्या रुपाने या ना त्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहिलं आहे. जर शिवसैनिकांचा मान ठेवायचा होता तर मग नारायण राणेंना का पद दिलं नाही? त्यामुळे शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं मी म्हणणार नाही."
पक्षप्रमुख म्हणून ते उद्धव ठाकरेंना मानतात याचा आपल्याला आनंद आहे असं संजय राऊत म्हणाले.

या सरकारच्या कामकाजात राजकारण करणार नाही असं संजय राऊत म्हणाले.

काल जे उपमुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलंय ते अडीच वर्षांपूर्वी स्वीकारलं असतं तर एवढं झालंच नसतं असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

अटलबिहारी बाजपेयी यांच्या नावाने सुरू झालेल्या या योजनेत ...

अटलबिहारी बाजपेयी यांच्या नावाने सुरू झालेल्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमचे म्हातारपण आरामात जाईल
वृद्धापकाळात, पेन्शन एक प्रकारे तुमचा आधार म्हणून काम करते. हे तुम्हाला सन्मानाने जीवन ...

शिवमोग्गा येथील हिंसाचारानंतर तुमकुरूमध्ये सावरकरांचे बॅनर ...

शिवमोग्गा येथील हिंसाचारानंतर तुमकुरूमध्ये सावरकरांचे बॅनर फाडले, कर्नाटकात तणाव कायम
स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवमोग्गा येथील सावरकरांच्या पोस्टरवरून झालेल्या वादानंतर आता ...

उद्यापासून दूध 2 रुपयांनी महागणार, अमूलपाठोपाठ मदर ...

उद्यापासून दूध 2 रुपयांनी महागणार, अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही दरवाढ केली
देशातील सर्वात मोठी दूध डेअरी अमूलने दुधाच्या दरात वाढ केली आहे. बुधवारपासून अमूलचे दूध 2 ...

राहत्या घरी जिलेटीच्या कांड्यांचा स्फोट करुन आत्महत्या

राहत्या घरी जिलेटीच्या कांड्यांचा स्फोट करुन आत्महत्या
मेळघाटमधील धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत आठ किलोमीटर अंतरावरील कळमखार गावातील रहिवाशी रामू ...

रस्ता नसल्याने घरातच प्रसूती, जुळ्यांचा मृत्यू

रस्ता नसल्याने घरातच प्रसूती, जुळ्यांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यात मोखाडा तालुक्यातील मरकटवाडीला रस्ता नसल्याने, एका गरोदर महिलेची घरातच ...