सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (10:10 IST)

Sachin Patil किरकोळ वादातून मनसे शहरप्रमुखाची हत्या

परभणी: रात्री दोनच्या सुमारास परभणीमध्ये मनसे शहरप्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. खुनाची ही खळबळजनक घटना घडली. मनसे शहरप्रमुख सचिन पाटील (Sachin Patil) यांची परभणीत हत्या करण्यात आली. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पुढील तपास परभणी पोलीस करत आहेत. खुनाच्या या घटनेने संपूर्ण परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  या हत्येमागे खरोखरच काही हेतू होता की अन्य काही वाद, हे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. त्याअंतर्गत पोलीस पुढील तपास करत आहेत. या हत्येचा मास्टरमाईंड सचिन पाटीलचा मित्र असल्याचाही संशय पोलिसांना आहे.