सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 7 जून 2024 (17:00 IST)

पुणे अपघात: अल्पवयीन मुलाच्या आईला रक्त बदलण्याचा सल्ला कुणी दिला?तपासात समोर आले

पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्श कार अपघातात अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्या प्रकरणात कोणाचा हात आहे याचा तपास लागला आहे.या प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई आणि ससून रुग्णालयातील HOD सह दोन डॉक्टरना अटक करण्यात आली आहे.

मुलाच्या आईला रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला कोणी दिला हे आता पोलिसांनी घेतलेल्या तपासात समोर आले आहे. अश्फाक मकानदार आणि डॉ तावरे यांनीच रक्त बदलण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुना ऐवजी आईच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला अश्फाक मकानदार आणि डॉ. तावरे यांनी दिल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे वडील आणि अश्फाक मकानदार यांची भेट एका कॅफेत झाली असून तुमच्यावर कारवाई होणार असा इशारा अश्फाक मकानदारने दिला असून आरोपीचे वडील नंतर पसार झाले त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. 

आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात अश्फाक मकानदार याने आरोपीच्या आईला मदत केली. हे तपासात समोर आले आहे. तसेच ससूनचे डॉ. तावरे आणि अश्फाक मकानदाराच्या मध्ये पाच महिन्यात 70 वेळा फोनवरून सम्पर्क झाला. रक्ताच्या नमुने बदलण्यात अश्फाक मकानदार याचा हात होता अश्फाकला पोलिसांनी अटक केली असून त्याला 10 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
 
Edited by - Priya Dixit