सोमवार, 5 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 28 जानेवारी 2021 (18:10 IST)

बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आनंद दिघेंचा पुतळा उभारा - मनसे

मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आता ठाण्यात आनंद दिघे यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
 
याबाबत ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेत त्यांच्याकडे निवेदन सादर केलं. ठाण्यातील मध्यवर्ती परिसर असलेल्या चिंतामणी चौकात दिघे यांचा पुतळा उभारण्यात यावा, असं यामध्ये म्हटलं आहे.
 
ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये आनंद दिघे यांचं योगदान बहुमूल्य आहे. हे शहर दिघे यांच्या स्मृती विसरु शकत नाही, असं मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी म्हटलं.