बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (10:56 IST)

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आढळले दुर्मीळ पांढरा अस्वल

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागात दुर्मीळ पांढर्‍या रंगाचा अस्वल शोधण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पात राबविण्यात येणाऱ्या कॅमेरा ट्रॅप प्रोजेक्ट अंतर्गत या दुर्मीळ ल्यूसिस्टीक अस्वलाचा छायाचित्र टिपण्यात आले. देशात प्रथमच अशा प्रकाराचे अस्वल आढळल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
'ल्यूसिसम' ही एक शारीरिक अवस्था आहे ज्यामध्ये शरीरातील रंगद्रव्याच्या थरांमध्ये आनुवांशिक बदल झाल्यामुळे प्राण्यांचा नैसर्गिक रंग जाऊन त्याचे केस, त्वचा, पंख पांढरे, तपकिरी व निस्तेज दिसू लागतात. यात डोळे मात्र अपवाद असतात. वन्यजीवात ल्यूसिसमची अनेक उदाहरणे आजवर आढळून आली आहेत. गुजराथ येथील दाहोडच्या जंगलात फिकट तपकिरी रंगाच्या अस्वालाची नोंद झाली आहे. तरी हे दुर्मिळ असल्याचे तज्ञांजे मत आहे. 
 
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात 4 मार्च रोजी सकाळी 5 वाजून 30 मिनटाच्या सुमारास या पांढऱ्या अस्वल मादाची नोंद करण्यात आली. मेळघाटमध्ये वन विभाग आणि 'भारतीय वन्यजीव संस्थान' (डब्लूआयआय) कडून कॅमेरा ट्रॅपिंगचा कार्यक्रम सुरू आहे. लाँगटाईम मॉनिटरींग ऑफ टायगर बेअरिंग एरिया ऑफ विदर्भ, महाराष्ट्र', असे या कार्यक्रमाचे नाव आहे. या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्याअंतर्गत कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते.
 
ही प्रौढ मादा असून सोबत काळ्या रंगाच्या नर अस्वलाचे छायाचित्रही टिपण्यात आले आहे.