भावाला वाचविण्यासाठी गेलेली बहिणही शेततळ्यात बुडाली, दोघांचा मृत्यू

satara
Last Modified मंगळवार, 18 जानेवारी 2022 (16:03 IST)
पाटण तालुक्यातील रोमनवाडी-येराड येथे फार्महाऊसवरील शेततळ्यात बुडून बहिण, भावाचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. सौरभ अनिल पवार (16) आणि पायल अनिल पवार (14) असे या मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. मासेमारी करणार्‍यांच्या साह्याने शोध घेऊन रात्री सातच्या सुमारास बहिण-भावाचे मृतदेहबाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे रोमनवाडी -येराड येथे एक फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊस वर सचिन जाधव कामासाठी आहे. सोमवारी सचिन यांच्याकडे त्यांचे नातेवाईक अनिल पवार आपल्या कुटुंबाला घेऊन भेटावयास आले होते. ते कामानिमित्त विजयनगर येथे वास्तव्यास आहे. मुलगा सौरभ हा आयआयटी महाविद्यालयात शिक्षण घेत होता तर मुलगी पायल ही इयत्ता आठवीत होती. पवार कुटुंब सचिन जाधव यांच्याकडे भेटायला आले होते.
सौरभ आणि पायल हे फार्महाउस पाहण्यासाठी गेले असता काळाने त्यांच्या मुलांवर झडप घातली आणि सौरभचा पाय घसरून तो फार्महाउस जवळच्या शेततळ्यात पडला. आणि बुडू लागला . आपल्या मोठ्या भावाला वाचविण्यासाठी गेलेली बहीण पायल ही देखील पाण्यात बुडू लागली आणि क्षणातच हे दोघे भाऊ बहीण शेततळ्याच्या पाण्यात बुडाले आणि त्यांचा दुर्देवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळतातच सचिन जाधव आणि मुलांचे आईवडील शेततळ्याजवळ पोहोचले तो पर्यंत ते दोघे बुडाले होते. ही दुर्देवी घटना सोमवारी सांयकाळी घडली. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांसह गावातील काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचे मृतदेह रात्री उशिरा मच्छीमार करणाऱ्या मुलांच्या मदतीने काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनास पाठविण्यात आले . मुलांचे मृतदेह पाहता आईने हंबरडा फोडला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

मोदींनी 8 वर्षांच्या कार्यकाळात 60 वर्षांच्या चुका

मोदींनी 8 वर्षांच्या कार्यकाळात 60 वर्षांच्या चुका सुधारल्या
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची गोळ्या घालून हत्या केली
बुधवारी रात्री उशिरा मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथे काश्मिरी टीव्ही कलाकार ...

महाराष्ट्रात 81 दिवसांनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण ...

महाराष्ट्रात 81 दिवसांनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण पीकवर, मुंबईतही रुग्णांमध्ये 35 टक्क्यांनी वाढ
बुधवारी महाराष्ट्रात 81 दिवसांत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर मुंबईत 102 ...

सर्व मशिदींचे उत्खनन करा, शिवलिंग सापडले तर आमचे आणि मृतदेह ...

सर्व मशिदींचे उत्खनन करा, शिवलिंग सापडले तर आमचे आणि मृतदेह सापडले तर तुमचे; भाजप नेत्याचे ओवेसींना आव्हान
वाराणसीतील ज्ञानवापी मशीद परिसराच्या सर्वेक्षणात शिवलिंग कथितरित्या आढळल्यानंतर वक्तृत्व ...

मंकीपॉक्सचं पुरळ कसं ओळखायचं?

मंकीपॉक्सचं पुरळ कसं ओळखायचं?
तुमच्या अंगावर बर्‍याच कारणांमुळे पुरळ उठू शकतं. अगदी मंकीपॉक्स या नव्या विषाणूमुळे ...