....म्हणून शरद पवारांनी दगडूशेठ हलवाई मंदिरात जाणं टाळलं"; कार्यकर्त्यांची माहिती

sharad pawar
Last Modified शुक्रवार, 27 मे 2022 (21:34 IST)
शरद पवार दर्शन न घेताच निघून गेल्याने चर्चांना उधाण
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी शरद पवारांनी पुण्यातील भिडे वाडा आणि दगडुशेठ हलवाई मंदिर परिसरात भेट दिली. शरद पवार मंदिरात जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मात्र शरद पवारांनी भिडे वाड्याची पाहणी केली आणि दगडुशेठ हलवाई मंदिरात

न जाताच पुढे प्रस्थान केलं. त्यामुळे शरद पवार मंदिरात का गेले नाहीत असा सवाल निर्माण होतोय.

शरद पवार मंदिरात का गेले नाहीत असा सवाल केला असता, राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, शरद पवार यांना मंदिरात जाण्याबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, मी आज मांसाहारी जेवण केलेलं आहे. त्यामुळे मंदिरात जाणं योग्य असणार नाही. त्यामुळे शरद पवार हे गाभाऱ्यात न जाताच निघाले. दरम्यान, यावेळी त्यांनी मुखदर्शन घेतल्याचं समजतंय. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका स्विकारल्यापासून त्यांच्या निशाण्यावर शरद पवार होते. शरद पवार हे नास्तिक असून, त्यांचा मंदिरातील किंवा दर्शन घेतानाचा फोटो किंवा व्हिडिओ क्वचितच आढळेल असं राज ठाकरे म्हणाले होते.
राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना शरद पवारांनी देवदर्शन हा प्रदर्शन करण्याचा विषय नाही असं म्हटलं होतं. तसंच यावरुन राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि बारामतीमधील पवार समर्थकांनी काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले होते. ज्यामध्ये शरद पवार स्वत: आरती करताना दिसत होते. एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार आज मंदिरात जाणार का? असा सवाल निर्माण झाला होता.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३ मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३ मोठ्या घोषणा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत चाचणीमध्ये यश ...

राज्यात पुढील तीन-चार तासात मुसळधार पावासाची शक्यता

राज्यात पुढील तीन-चार तासात मुसळधार पावासाची शक्यता
राज्यात सर्वत्र पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत काल पासून पावसाच्या सरी कोसळत आहे. ...

INDW vs SLW: भारतीय महिला संघाने दुसऱ्या सामन्यात ...

INDW vs SLW: भारतीय महिला संघाने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला
भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघाचा ...

IND vs ENG: रोहित शर्माची कोरोनावर मात ,आयसोलेशनमधून बाहेर

IND vs ENG: रोहित शर्माची कोरोनावर मात ,आयसोलेशनमधून बाहेर
भारतीय कर्णधार रोहित शर्माने अखेर कोरोनाचा पराभव केला आहे. रोहितचा नवीनतम कोविड-19 चाचणी ...

अकोलाचा भाविक अमरनाथ यात्रेत 100 फूट दरीत कोसळला

अकोलाचा भाविक अमरनाथ यात्रेत 100 फूट दरीत कोसळला
अकोला जिल्ह्यातील जम्मू काश्मीर येथे अमरनाथ यात्रेला गेलेले सत्यनारायण तोष्णेयार हे ...