बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (19:18 IST)

नवरीचे कान कापून दागिने चोरी

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहर परिसरात असलेल्या एका बंगल्यातदरोडेखोरांनी मध्यरात्री 3.30 वाजता दरोडा टाकला. दरोडेखोरांनी गळ्यात चाकू लावन घरातील महिलांच्या अंगावरील दागिने रोख रक्कम असा 4.5 लाख रुपयांचा ऐवज  लंपास केल्याची बातमी मिळाली आहे.  यावेळी नववधुसह महिलांच्या कानातील दागिने काढताना त्रास होऊ लागल्याने चक्क कात्रीने कानाला कट मारुन दागिने काढण्याचा प्रकार चोरट्यांनी केला. 
या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.