शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 डिसेंबर 2022 (09:52 IST)

अंधारेंच्या सभेत राडा करत सभा उधळण्याची धमकी दिली आता सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय

sushma andhare
मनसेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षांनी अंधारेंच्या सभेत राडा करत सभा उधळण्याची धमकी दिली. यावर आता सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय. “तो म्हणतो सुषमा अंधारेंची सभा उधळेल, पण अरे काय वाघा, इथं माणसं किती, तुझ्यासोबत बोलताना माणसं किती? उगाच शेळीने उंटाचा मुका घ्यायला गेलं म्हणजे जमतं का?” असा प्रश्न सुषमा अंधारेंनी विचारला. त्या मंगळवारी (६ डिसेंबर) उस्मानाबादमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होत्या.
 
सुषमा अंधारे म्हणाल्या, “मनसेचा नेता म्हणाला की, आम्ही सुषमा अंधारेंची सभा उधळून लावू, पण काल सभा उधळलीच नाही. त्यांनी आज तरी सभा उधळायला यायचं होतं. त्यांचं गपाट की काहीतरी नाव होतं. हे असेच गपाटे लोकं असतात. उगाच गप्पा ठोकत राहतात. बरं आज तो नेता जिथं कुठं असेल तर त्याला चहापाणी करा. आपण चहापाणी करून पाहुणचार केला पाहिजे.”