बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 1 मे 2022 (14:27 IST)

उष्णतेने गाठला उच्चांक, एप्रिल ठरला सर्वात उष्ण महिना

सध्या देशात अनेक राज्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. उन्हाचा झळा होरपळून काढत आहे. सध्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे.संपूर्ण देशासह राज्यात सूर्य आग ओतत आहे. राज्यात तापमान 40 च्या पुढे गेला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान 44 च्या पुढे गेला आहे. सध्या उकाडा जास्त वाढल्यामुळे उन्हाचा चटका वाढल्याने थंड पेयाच्या दुकानात नागरिकांची गर्दी होत आहे. उसाचा रस,ताक, लस्सी, बर्फाचे गोळे घेताना लोक दिसत आहे.
 
उन्हापासून वाचण्यासाठी लोक रुमाल, टोपी, हातमोजे स्कार्फ वापरत आहे. वाहतूक सिग्नल वर देखील वाहन चालक आपली वाहने सावलीत लावतात. जेणे करून उन्हा पासून बचाव करता येईल. 
 
या वर्षीचा एप्रिल महिना 1900 नंतर भारतातील चौथा सर्वाधिक उष्ण महिना होता. तर भारताच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागात एप्रिल हा 122 वर्षांतील सर्वात उष्ण ठरला आहे. एप्रिल 1 ते 28 पर्यंत, वायव्य भारतात सरासरी तापमान 35.9 °C होते तर मध्य भारतात 37.78 °C होते.
 
यंदा एप्रिल ठरला सर्वाधिक कडक उन्हाळाचा महिना. भारतात यंदा एप्रिल महिन्यात तापमान वर्ष 1900 नंतर पहिल्यांदा सर्वाधिक होतं.तसेच मे महिन्यात देखील उत्तर आणि पश्चिम भारतात तापमान सामान्यांपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
तर देशातील उर्वरित भागात तापमान एवढे राहणार नाही. मे महिन्यात उत्तर पश्चिम, मध्य पूर्व, आणि ईशान्य भागात तापमान सामान्य राहणार आहे. तर दक्षिण द्वीपकल्पीय भारतात आणि वायव्य भारताच्या काही भागात सामान्य तापमान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.