'राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली
तीन आठवड्यानंतर मार्च महिन्यात होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' हे नाव कायम राहील, असे स्पष्ट करत, शरद पवार गटाला एका आठवड्यात पक्षाचे चिन्ह बहाल करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. मात्र, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
पक्षाची घटना, रचना आणि विधिमंडळातील संख्याबळ या त्रिसुत्रीच्या आधारावर अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरतो, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद पक्षातील फूट नाही. त्यामुळे दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले होते. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकाला विरोधात अजित पवार गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Edited By -Ratnadeep Ranshoor