शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जुलै 2019 (16:49 IST)

किसान सभेचा आंदोलनाचा इशारा

यंदाचे जाहीर करण्यात आलेले आधार भाव पाहता आता निविष्ठाचा रास्त खर्च व कुटुंबाची रास्त मजुरी सुद्धा विचारात घेण्यात आलेली नाही हे उघड आहे. शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा संतापजनक प्रकार आहे. शेतक-यांवरील या अन्यायाविरोधात संघर्षासाठी राज्यभर रस्त्यावर आंदोलन करणार असल्याचा इशारा किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.
 
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रमुख पिकांना दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली होती. मात्र निवडणुका संपताच मोदी सरकारने शेतक-यांना आपला खरा चेहरा दाखवत आधार भावात सातत्याने भरीव वाढ करण्याच्या आपल्या घोषणेला हरताळ फासला आहे असा आरोप  नवले यांनी केला आहे.