बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जुलै 2022 (08:34 IST)

आमदार संतोष बांगर यांनी एका डॉक्टरला केलेल्या कॉलचं रेकॉर्डिंग व्हायरल

कोणताही लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील कार्यकर्ते असो की सर्वसामान्य नागरिक म्हणजेच मतदार यांची काळजी घेत असतो. किंबहुना ते त्यांचे कर्तव्य ठरते. त्यामुळे मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणे जावे लागते. काही आमदार अशा प्रकारे काळजी घेतात. हिंगोली जिल्ह्यातील एका आमदाराने देखील एका रुग्णाच्या नातेवाईकांनी फोन केला असता त्याची अडचण समजून घेतली, तसेच त्यासंदर्भात डॉक्टरांना फोन करीत पैसे न घेता सोडून देण्याचे आवाहन केले कारण तो रुग्ण उपचार सुरू असतानाच दगावला होता. सध्या यासंदर्भातील ही व्हिडिओ क्लिप सर्वत्र व्हायला होत आहे. याबाबत आमदार संतोष बांगर यांचे कौतुक करण्यात येत आहे तसेच त्या संदर्भात उलटसुलट चर्चा देखील होत आहे. त्यामध्ये ज्यांची आई वारली आहे, त्यांना आमदार बांगर यांनी आधार दिला आहे आणि पेशंट घरी घेऊन जाण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर डॉक्टरला पेशंट सोडून देण्यास सांगितले आहे. त्यांचा कॉल रेकॉर्ड सगळीकडे व्हायरल झाला आहे.