शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (18:18 IST)

बसमध्ये महिलेची प्रसूती झाली, महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला

कर्नाटकाच्या देवदुर्ग येथून पुण्याला निघालेल्या  कर्नाटक महामंडळाच्या बस मध्ये प्रवासा दरम्यान प्रसूती झाली. महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिले. प्रसवानंतर या महिलेला आणि तिच्या बाळाला नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. महिला आणि बाळाची तब्बेत उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. महिलेची प्रसूती सहप्रवाशांच्या मदतीने करण्यात आली.
 
 मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती सोमनाथ चव्हाण(20) ही महिला पुणे भोसरी येथील रहिवाशी असून पहिल्या बाळंतपणासाठी आपल्या माहेरी वडिलांकडे कर्नाटकातील मानवी तालुक्यात मुरामपुरतांडा येथे गेली होती. पण तिथल्या डॉक्टरांनी प्रसूती शस्त्रक्रिया करून करावी लागणार असे सांगितले. महिलेने हे सर्व पुण्यात राहणाऱ्या आपल्या पतीला सांगितले. पैसे अभावी त्यांनी परत पुण्यात येण्याचे ठरविले. 
 
रात्री ही महिला बसने देवदुर्ग येथून पुण्याकडे निघाली असताना रात्रीच तिला प्रसव वेदना सुरु झाल्या  आज सकाळी तिला लोणंद पाडेगावाजवळ आल्यावर जास्त वेदना होऊ लागल्याने बस मधील इतर महिला सहप्रवाशांच्या लक्ष्मी पवार, नागेश्वरी पवार, रीरेमा राठोड यांच्या मदतीने तिची प्रसूती करण्यात आली  आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
 
दरम्यान  कर्नाटक परिवहनचे चालक, वाहकांने 108 वर फोन करून रुग्णवाहिका बोलावली  नंतर महिलेला नीरा येथील प्राथमिक केंद्रात दाखल करण्यात आले. महिला आणि बाळ दोघेही उत्तम असल्याचे डॉ समीक्षा कांबळे यांनी सांगितले.