बसमध्ये महिलेची प्रसूती झाली, महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला

baby
Last Modified रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (18:18 IST)
कर्नाटकाच्या देवदुर्ग येथून पुण्याला निघालेल्या
कर्नाटक महामंडळाच्या बस मध्ये प्रवासा दरम्यान प्रसूती झाली. महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिले. प्रसवानंतर या महिलेला आणि तिच्या बाळाला नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. महिला आणि बाळाची तब्बेत उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. महिलेची प्रसूती सहप्रवाशांच्या मदतीने करण्यात आली.


मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती सोमनाथ चव्हाण(20) ही महिला पुणे भोसरी येथील रहिवाशी असून पहिल्या बाळंतपणासाठी आपल्या माहेरी वडिलांकडे कर्नाटकातील मानवी तालुक्यात मुरामपुरतांडा येथे गेली होती. पण तिथल्या डॉक्टरांनी प्रसूती शस्त्रक्रिया करून करावी लागणार असे सांगितले. महिलेने हे सर्व पुण्यात राहणाऱ्या आपल्या पतीला सांगितले. पैसे अभावी त्यांनी परत पुण्यात येण्याचे ठरविले.

रात्री ही महिला बसने देवदुर्ग येथून पुण्याकडे निघाली असताना रात्रीच तिला प्रसव वेदना सुरु झाल्या
आज सकाळी तिला लोणंद पाडेगावाजवळ आल्यावर जास्त वेदना होऊ लागल्याने बस मधील इतर महिला सहप्रवाशांच्या लक्ष्मी पवार, नागेश्वरी पवार, रीरेमा राठोड यांच्या मदतीने तिची प्रसूती करण्यात आली
आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

दरम्यान
कर्नाटक परिवहनचे चालक, वाहकांने 108 वर फोन करून रुग्णवाहिका बोलावली
नंतर महिलेला नीरा येथील प्राथमिक केंद्रात दाखल करण्यात आले. महिला आणि बाळ दोघेही उत्तम असल्याचे डॉ समीक्षा कांबळे यांनी सांगितले.



यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 7 नवे रुग्ण

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 7 नवे रुग्ण
महाराष्ट्रात सात जण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत Omicron चे एकूण ...

5 मुलींसह आईने विहिरीत उडी घेतली, गावकऱ्यांनी 6 मृतदेह ...

5 मुलींसह आईने विहिरीत उडी घेतली, गावकऱ्यांनी 6 मृतदेह बाहेर काढले, पती म्हणाला- मी घराबाहेर होतो
राजस्थानमधील कोटा येथे रविवारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे पतीने त्रासलेल्या ...

औरंगाबादमध्ये सैराटची पुनरावृत्ती! भावानेच बहिणीची केली ...

औरंगाबादमध्ये सैराटची पुनरावृत्ती! भावानेच बहिणीची केली हत्या
औरंगाबाद येथे एक धक्कादायक घटनेत प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच 19 वर्षीय मुलीची ...

धक्कादायक ! पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने खाल्ल्या ...

धक्कादायक ! पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने खाल्ल्या थायराइडच्या 50 गोळ्या
पती सारखे माहेरून पैसे आणायची छळ करायचा कधी घराचे कर्ज फेडण्यासाठी तर कधी कारचे कर्ज ...

India tour of South Africa: अजिंक्य राहणे ऐवजी रोहित ...

India tour of South Africa: अजिंक्य राहणे ऐवजी रोहित शर्माला उपकर्णधार पदाची जबाबदारी मिळू शकते
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या त्याच्या फॉर्मशी झगडत आहे. ...