1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (21:23 IST)

हॉटेलचे बिल भरण्याच्या रागातुन झालेल्या मारहाणीत वेटरचा मृत्यु

नाशिक येथील औद्योगिक परिसर सातपूर येथील  हॉटेलचे बिल मागितल्याचा राग आल्याने झालेल्या मारहाणीत एका वेटरचा मृत्यु झाल्याची घटना सातपुर परिसरात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशोकनगर येथील शास्वत बार येथे काल रात्री बिल देण्याच्या वादातून 3 जणांच्या टोळक्याने वेटरला मारहाण केली. या तरुणाचा सकाळी उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. नितेश कुमार शामप्रसाद सिन्हा असे या मारहाणीत मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नितिश कुमार शामप्रसाद सिन्हा (वय 31, रा. जाधव संकुल, सातपूर) हा दहा वर्षापासून अशोकनगर येथील शास्वत बार येथे कामाला आहे. काल नेहमीप्रमाणे बारमध्ये काम करत असताना रात्री नऊ वाजता तेथे काही युवक दारू पिण्यासाठी आले. त्यांचे दारू पिणे झाल्यावर ते जायला निघाले. त्यांच्याकडे वेटरने बिल मागितले याचा त्यांना राग आला.
त्यांनी त्या वेटरला जबर मारहाण केली. रात्री नितिश कुमार घरी गेला असता त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी एका खासगी दवाखान्यात दाखल केले. परंतु, तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेन्याचा सल्ला दिला. म्हणून त्याच्या नातेवाइकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले. तिथे उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. या घटनेचे वृत्त समजताच त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली.
जो पर्यंत हॉटेल मालक व संशयित यांच्यावर कारवाई होत नाही, तो पर्यंत नातेवाइकांनी शव घेण्यास नकार दिला. यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढत त्यांना शांत केले. या घटनेची नोंद करण्याचे काम सुरु असून पुढील तपास पोलीस करत आहे.