शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जून 2022 (11:34 IST)

Russia Ukraine War:रशियाने युक्रेनियन मॉलला लक्ष्य केले, 16 ठार, 60 जखमी

Russia Ukraine War:सोमवारी युक्रेनमधील एका मॉलवर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान 16 लोक ठार झाले आणि 60 जण जखमी झाले. अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियन क्षेपणास्त्राचा मारा झाला तेव्हा शॉपिंग मॉलमध्ये हजाराहून अधिक लोक होते.
 
सोमवारी रशियन क्षेपणास्त्राने युक्रेनमधील एका मॉलवर हल्ला केला.एका वृत्तसंस्थेने गव्हर्नरच्या हवाल्याने म्हटले आहे की, क्रेमेनचुक शहरात झालेल्या हल्ल्यात 16 जण ठार तर 59 हून अधिक जखमी झाले आहेत.
 
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियन क्षेपणास्त्राचा हल्ला  झाला तेव्हा शॉपिंग मॉलमध्ये हजाराहून अधिक लोक होते.
 
जखमीं लोकांचा आकडा  अद्याप निश्चित करणे कठीण आहे.युक्रेनमधील मॉलवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
ज्यामध्ये इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी आहे.आकाशात काळ्या धुराचे लोट दिसत आहेत. जखमींना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. रशियन क्षेपणास्त्र नागरी इमारतीवर आदळण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे.
 
रविवारी युक्रेनने दावा केला की, रशियन क्षेपणास्त्राने कीवमधील निवासी इमारतीवर हल्ला केला.या हल्ल्यात एका मुलीसह चार जण जखमी झाले.