बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. जाणता राजा
Written By वेबदुनिया|

कवि भूषणकृत 'शिवस्तुती'

देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हिंडून ज्यांनी 'हिंदवाना'ला कृत‍ि करण्यास जागृत करून, हिंदूंच्या मुक्ततेचे रण लढावयास नि तें यशस्वी करण्यास स्फूर्ति दिली, त्या आपल्या राष्ट्रीय भाटांत अत्यंत प्रख्यात असा जो 'भूषण' त्याने औरंगजेबाला पुढील सवाल टाकलेला आहे.

''लाज धरौ शिवजीसे लरौ सब सैयद शेख पठान पठायके।
भूषन ह्यां गढकोटन हारे उहां तुग क्यों मठ तोरे रियासके।।
हिंदुके पति सोंन विसात सतावत हिंदु गरीबन पायके।
लीजे कलंक न दिल्लीके बालम आलम आलमगीर कहायके।।

आणखी एके ठिकाणी भूषण लिहितो--
''जगतमे जीते महावीर महाराजन ते
महाराज बावन हूं पातसाह लेवाने।
पातसाह बावनौ दिल्लीके पातशाह दिल्लीपती
पातसाह जींसो हिंदुपति सेवाने''
दाढीके रखैयन की दाढीसी रहति छाति
वाढी जस मर्याद हद्द हिंदुवाने की
कढि गयि रयतिके मनकी कसम मिट गयी
ठसक तमाम तुरकानेकी
भूषण भनत दिल्लीपति दिल धकधका सुनिसुनि
धाक सिवराज मरदानेकी
मोठी भयि चंडि बिन चोटीके चबाय सीस
खोटी भयि संपत्ति चकताके घरानेकी ।।''

(गरीब बिचार्‍या हिंदु गोसाव्या भिकार्‍यांना छळून आणि हिंदू मठमंदिरांचा विध्वंस करून हे औरंगजेब, तू काय मोठी फुशारकी मिरवतोस? स्वत: हिंदुपतीशीं सामना देण्याचे धैर्य. तुज जवळ कोठे आहे? हिंदुसम्राट शिवरायांनी तुझी रग जिरविली असल्याने आलमगीर म्हणजे जगाला जिंकणारा अशी धादांत खोटी पदवी आपल्यामागे लावून घेताना तुला एवढीसुध्दा लाज कशी वाटत नाही?)

शिवाजीने केलेल्या पराक्रमाविषयी भूषण गातो-
राखी हिंदुवानो, हिंदुवानके तिलक राख्यो,
स्मृति और पुराण राख्यो वेद विधी सुनि मै

राखी रजपूती राजधानी राखी राजनकी,
धरामे धरम राख्या राख्यो गुण गुणीमे
भूषण सुकीवंजीति हद्द मरहट्टनकी, देसदेस
करिति बखानी तव सुनि मैं
साहीके सुपूत सिवराज समरेस 'तेरी' दिल्लीदल
दाबीक दीवाल राखी दुनिमै ।।

(स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'हिंदूत्व'मधून साभार)