बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. जाणता राजा
Written By वेबदुनिया|

छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय

श्रीपाद नांदेडकर, मुंबई.

MH GovtMH GOVT
मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचे ठिकाण. येथे देश-परदेशातले पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात आणि ते तेथील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देतात. त्या स्थळांबरोबरच मुंबईचे पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आणि आताचे श्री छत्रपती शिवाजी महाराज-वस्तुसंग्रहालय आहे. गेट वे ऑफ इंडियाकडे जाताना लायन गेट, विधानभवन, मुंबई विद्यापीठ आणि चौथी वास्तू म्हणजे अत्यंत देखण्या उमेदीत उभे असलेले हे म्युझियम आहे. त्यावेळी ब्रिटिश वास्तुविशारद. डब्ल्यु.जी. विटेट यांनी याचा आराखडा बनविला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे इ.स. 1922 मध्ये सर्वांना पाहाण्यासाठी ही वास्तु खुली करण्यात आली.

या ठिकाणी पाहाण्यासाठी व अभ्यासाठी खूप काही आहे. एकदा का आत प्रवेश केला तर पुढे पुढे जात वेळ केव्हा संपतो व 3/4 तास कसे निघून जातात, ते कळत नाही. येथे काळे, पांढरे पाषाणांचे प्राचीन शिल्प आहे. तसेच पाचव्या शतकातली मूर्तीही आहे. गांधारकाली व अनेक बुद्धमूर्ती देखील पक्ष आहेत. पौणी, पितळखोरा. सिंधु खोर्‍यातील संस्कृती, इ.स. 1649 मधील रामायणाची सुमारे 200 लघुचित्रे तसेच अनेक प्राचीन कलात्मक चित्रे या ठिकाणी पाहावयास मिळतात. इ.स. 1550-70 या काळातील मुगल शैली, 1641 मधील दुर्मिळ चित्रे आणि दुर्मिळ सचित्र हस्तलिखीतेही या ठिकाणी पाहावयास मिळतात.

सामुद्रिक वारसा या विशेष दालनात नौकावहन, तंत्रज्ञानाची माहिती, समुद्र मार्ग नकाशे आदींची अभ्यासापूर्ण माहिती येथे मिळते. भारतीय पक्षी, सस्तन प्राणी, मासे, सरपटणारे प्राणी यांची सत्य स्वरुपातील खूप छानदार छबी या ठिकाणी उपलब्ध आहेत. 18 व्या व 19 व्या शतकातील मौल्यवान दगड, काष्ट, खंजीर अशा विविध कलेचेही दर्शन येथे होते.

येथील तळमजल्यात सिंधुसंस्कृती भारतीय शिल्पाचा परिचय करुन होते. तर पहिल्या मजल्यावर कलावस्तू, भारतीय लघुचित्रे व नौकानयनाची माहिती मिळते. तर दुसर्‍या मजल्यावर चीन, जपान तसेच वस्त्र विभाग, युरोपियन चित्रे व प्राचीन शस्त्रे यांचे दालन आहे. भारतीय शस्त्र भांडाराची विपुलता व वि‍‍विधता यांची माहितीही येथे होते. अल्लाउद्दिन खिलजीची तलवार (खांडा) आणि सन 1593 सालचे सम्राट अकबराचे ‍‍‍चिलखत आणि ढालही या दालनाची प्रमुख आकर्षणे आहेत. या म्युझियमध्ये स्व्रिस्तोत्तर 12 वे शतकातील पाटण-गुजरात येथील पटोला साड्या पाहावयास मिळतात. 1898 मधील जपानची फुलदाणी शोताई शिफोतंत्र या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतात. या म्युझियममध्ये अति पौर्वात्य कलाही सुबकपणे मांडलेल्या दिसून येतात. अनेक प्रकारची प्राचीन-अर्वाचीन तैलचित्र या ठिकाणी आहेत.

प्रत्येक मंगळवारी मुले व विद्यार्थी यांना येथे मोफत प्रवेश मिळतो. मंगळवार ते रविवार सकाळी 10.15 ते सांयकाळी 5.45 वाजता हे वस्तुसंग्रहालय पाहावयास मिळते. येथील पुरेपूर माहिती करुन घेणार्‍या रसिकांना व अभ्यासकांना किमान 4 ते 5 तास वेळ लागतो. वस्तूसंग्रहालय दर सोमवारी बंद असते. येते इंटरनेट सेवा सुद्धा उपलब्ध आहे. चला, समस्त विश्वाची माहिती करुन घेण्यासाठी मुंबईचे वस्तुसंग्रहालय पाहावयास.