Pitru Moksha Amavasya पूर्वजांच्या मृत्यूचा दिवस माहित नसेल, तर या दिवशी तर्पण करावे
Pitru Moksha Amavasya पितृपक्षाच्या वेळी पितृलोकाचे दरवाजे उघडले जातात जेणेकरून पितरांना त्यांच्या मुलांना- कुटुंबाला भेटून त्यांची अवस्था पाहता येते. अशा वेळी पितरांना प्रसन्न करून त्यांना मुक्त करण्याची संधी मुलांनाही मिळते. रामायणात श्रीरामाने आपले पिता दशरथ यांचे श्राद्ध केले होते, तर महाभारतात कर्णालाही आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करावे लागले होते. पितर सुखी नसतील तर पितृदोष होतो आणि मुले सुखाने राहू शकत नाहीत. त्यामुळे पितरांचे श्राद्ध फार महत्वाचे आहे.
पण जर पितराचा मृत्यूचा दिवस किंवा तारीख माहीत नसेल तर श्राद्ध किंवा तर्पण कसे करावे?
उदाहरणार्थ समजा एखादा पूर्वज प्रवासाला निघून गेले अथवा मरण पावले पण घरातील सदस्यांना त्यांच्या मृत्यूची निश्चित तारीख माहित नसेल तर पितृ पक्षात श्राद्ध किंवा तर्पण कोणत्या तिथीला करावे? याचे उत्तर गरुड पुराणात आहे.
पितृ मोक्ष अमावस्या म्हणजे काय?
गरुड पुराणात म्हटले आहे की जर एखाद्या पूर्वजाच्या मृत्यूची तारीख माहित नसेल तर पितृ पक्षाच्या अमावास्येला श्राद्ध तर्पण किंवा पिंड दान केले जाऊ शकते, याला पितृ मोक्ष अमावस्या देखील म्हणतात. तर्पण करणाऱ्या व्यक्तीने सकाळी सूर्योदयाच्या वेळी उठून स्नान करावे, आपल्या देवी-देवतांचे स्मरण करावे आणि पितरांना जल अर्पण करावे. पाणी देताना प्रथम अक्षत, कुश आणि तीळ पाण्यात ठेवा. जर तुम्हाला पिंडदान करायचे असेल तर त्यासाठी पुरोहिताशी संपर्क साधा कारण श्राद्धाची पद्धत इतकी सोपी नाही आणि ब्राह्मणाशिवाय श्राद्ध करू नये.
यासोबतच आपल्या पूर्वजांना जे पदार्थ आवडले ते सर्व त्यांना अर्पण करा. नंतर हे अन्न कावळा, गाय, कुत्र्याला खाऊ घाला आणि झाडाच्या मुळाशी ठेवा. तसेच त्या दिवशी दक्षिण दिशेला दिवा लावावा.
टीप: ही माहिती उपलब्ध असलेल्या गृहीतकांवर आणि माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कृपया कोणतीही माहिती आणि गृहितके कृती करण्यापूर्वी किंवा अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.