शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. सिंहासन बत्तिशी
Written By वेबदुनिया|

सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 11

WD
राजा विक्रमादित्य नेहमी आपल्या प्रजेच्या सुखासाठी चिंतीत असे. एकदा त्याने एक एक महायज्ञ करण्याचे ठरविले. त्याने मोठ्यासंख्येने राजा-महाराजा, विद्वान, ॠषिमुनी व देवतांना आमंत्रण पाठविले.

पवन देवाला त्यांनी स्वत: आमंत्रित करण्‍याचे ठरविले तर समुद्र देवाला आमंत्रित करण्यासाठी एका ब्राह्मणाला पाठविले.
राजा विक्रम निघाला. जंगलात पोहचल्यानंतर त्याला योग-साधनेने कळले की, पवन देव सध्या सुमेरु पर्वतावर वास करीत आहे. त्याने पर्वतावर जाण्याचे ठरविले. राजाने दोन वेताळांचे स्मरण करताच ते तेथे उपस्थित झाले व राजाला घेऊन ते सुमेरु पर्वतावर पोहचले. तेव्हा पर्वतावर सोसाट्याचा वारा सुटला होता.

मोठ मोठे वृक्ष व पहाड आपल्या जागेवरून उडून जाताना दिसत होते. असे पाहून राजा थोडाही घाबरला नाही. राजा योग-साधनेत पारंगत होता. त्यामुळे राजा एका जागी स्थीर बसून राहिला. पवन देवाच्या साधनेत राजा लीन झाला. नंतर पवन देवाने राजाच्या साधनेवर प्रसन्न होऊन त्याला वर मागितला.

राजा विक्रमाने त्यांना महायज्ञाप्रसंगी उपस्थिती राहण्यासाठी आमंत्रित केले. पवणदेयाने राजाचे आमंत्रण स्विकारले, राजाला आर्शिवाद दिला व क्षणात अंतर्धान पावले. दोन वेताळांनी राजाला आपल्या राज्याच्या सिमेवर आणून सोडले.

विक्रमाने एका ब्राह्मणाला समुद्र देवाला आमंत्रित करण्यासाठी पाठविले होते. तो ब्राह्मण समुद्रा काठी पोहचला. त्याने देवाला आवाहन केले. तेव्हा समुद्र देवाने पवणदेवाप्रमाणे उत्तर दिले की, महायज्ञाना ते सशरीर येऊ शकत नाही. त्यांनी राजा विक्रमाला यज्ञासाठी शुभेच्छा दिल्या व राजाला पाच रत्ने व एक घोडा भेट म्हणून दिला. ब्राह्मण घोडा व रत्न घेऊन परतीच्या प्रवासाला लागला. ब्राह्मणाला पायी चालताना पाहून घोडा पुरुषांच्या आवाजात म्हणाला, ''तू माझ्या पाठीवर का बसत नाहीस?'' ब्राह्मण घोड्यावर बसताच घोडा वार्‍या वेगाने राजा विक्रमाच्या दरबारात दाखल झाला.

ब्राह्मणाने राजाला सारी हकिकत सांगतिली. ब्राम्हणाने घोडा व पाच रत्ने राजाला दिली. परंतू ती त्या ब्राह्मणाला पाहिजे होती. त्याने राजाचा मागताच राजाने कोणताच विचार न करता ब्राह्मणाला देऊन टाकले.