बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. स्वाइन फ्लू
Written By वेबदुनिया|

स्‍वाइन फ्लूः प्रयोगशाळेतील चुकीचा परिणाम

प्रयोगशाळेतील शोधा दरम्‍यान झालेल्‍या चुकीचा परिणाम म्हणजे 'स्‍वाइन फ्लू' असल्‍याचा दावा एका ऑस्ट्रेलियन संशोधकाने केला आहे. या शास्‍त्रज्ञाच्‍या मतानुसार स्‍वाइन फ्लूचा व्‍हायरस 'एच1एन1' प्रयोगादरम्‍यान झालेल्‍या अपघाताचा परिणाम असण्‍याची दाट शक्यता आहे.

'ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्‍हर्सिटी'चे शास्‍त्रज्ञ एड्रियान गिब्स यांनी दिलेल्‍या माहितीनुसार अंड्यापासून एक नवीन व्‍हायरस बनविण्‍याचा आणि त्‍याच्‍या मदतीने लस शोधून काढण्‍यासाठी शास्‍त्रज्ञांचा प्रयत्‍न चालला असताना झालेल्‍या चुकीतून या रोगाचा व्‍हायरस तयार झाल्‍याची शक्यता अधिक आहे.

गिब्स यांच्‍या मदतीनेच 'टॅमीफ्लू' हे स्‍वाइन फ्लू वरील औषध बनविले गेले आहे. आपले म्हणणे आपण सिध्‍द करू शकतो असा दावाही गिब्‍ज यांनी केला आहे.