बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बराक ओबामा
Written By वार्ता|

अमेरिकेत 'ओबामामॅनिया'

बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेण्याला अवघे काही तास उरले असताना अमेरिकी जनतेत प्रचंड उत्साह दिसत आहे. हा ऐतिहासिक क्षण संस्मरणीय ठरावा यासाठी येथील नॅशनल मॉलमध्ये हॉलीवूड कलावंतांचा शानदार कार्यक्रम झाला. कडाक्याची थंडी असूनही लोकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला.

तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सुरवात झाली त्यावेळेसच मॉल पूर्ण भरून गेला होता. ओबामा, पत्नी मिशेल, त्यांच्या दोन मुली मालिया व शासा तसेच नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन, त्यांची पत्नी जिल यांनी लिंकन मेमोरियलच्या पायऱ्यावंर उभे राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटला. खाली मैदानावर प्रचंड गर्दी संगीताच्या तालावर झुलत होती. आनंद व्यक्त करत होती.

या कार्यक्रमाची सुरवात ब्रुस स्प्रिंग्स्टिन यांच्या द रायझिंग या मशहूर गीताने झाली, तर सांगता बेयॉन्स याच्या अमेरिका द ब्युटिफूलने झाला. अन्य कलावंतांमध्ये यू 2 बॅंड, गार्थ ब्रुक्स, स्टिव्ह वॉन्डर, पीट सीगर, मेरी जे ब्लिग, जेम्स टेलर, जॉन लीजेंड, जॉन मिलिनकॅम्प, जोश ग्रोबन व रिनी फ्लेमिंग आदी सहभागी होते.

ओबामा यांच्या दिवसाची सुरवात एर्लिंगटन नॅशनल सिमेटेरियो येथे शहिदांच्या स्मारकावर श्रद्धांजली वाहून झाली. फिलाडेल्फियाहून निघालेल्या रेल्वेगाडीत ओबामांबरोबर श्री. बिडेनही होते. ओबामा 19व्या शतकात बांधलेल्या आफ्रिकी-अमेरिकी चर्चमध्येही गेले. लोकांनी त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत केले. एका मुलाने बेंचवर उभे राहून मार्टिन ल्युथर किंगचे शब्द- प्री एट लास्ट, प्री एट लास्ट थॅंक गॉड अलमायटी वुई आर प्री एट लास्ट- उच्चारले आणि सारे सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेले.

बॉलीवूडमधील ख्यातनाम कलावंत टॉम हॅक्स, जेमी फॉक्स, डेन्झिल वॉशिंग्टन व क्वीन लॅटिफ यांनी संगीतमय कार्यक्रम सादर केला. यावेळी गोल्फपटू टायगर वूड्सही उपस्थित होता.