सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 8 मार्च 2021 (12:43 IST)

योगासनाचे नियम- योगासनाचे नियम पाळा निरोगी राहा

योग करणे हे सर्व शारीरिक आणि मानसिक आजारांवरचे समाधान आहे योगा केल्याने माणूस शारीरिक आणि मानसिक दृष्टया सुदृढ राहतो. मोठ्या मोठ्या आजारांना दूर करण्यासाठी योग आवश्यक आहे आणि महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्ट करताना काही नियम असतात त्या प्रमाणे  
योग करताना काही नियम असतात ज्यांना पाळून योगा अभ्यास केल्याचा पूर्ण लाभ मिळतो. चला तर मग जाणून घेऊ या काय आहेत ते नियम 
 
1 एखाद्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास सुरु करा. 
 
2 योगाभ्यास करण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्ताची आहे. 
 
3 योगा करण्याच्या पूर्वी स्नान करा. 
 
4 योगा नेहमी अनोश्यापोटी करावा.योगा करण्यापूर्वी काहीच खाऊ नका.
 
5 आरामदायक सूती कापडे घाला.
 
6 शरीराप्रमाणे मन देखील स्वच्छ असावे. 
 
7 योगा करण्यापूर्वी सर्व वाईट विचारांना मनातून काढून टाका. 
 
8 एखाद्या शांततेच्या ठिकाणी आणि स्वच्छ जागेवर योगाभ्यास करा. 
 
9 आपले संपूर्ण लक्ष योगाभ्यासावर केंद्रित करा.
 
10 योग नेहमी संयम आणि चिकाटीने करा.
 
11 आपल्या शरीरावर बळजबरी किंवा जबरदस्ती अजिबात करू नका.
 
12 धेर्य ठेवा योगाचे फायदे मिळण्यास वेळ लागतो. 
 
13 सतत योगाभ्यास सुरूच ठेवा. 
 
14 योग केल्यावर अर्धा तास काहीच खाऊ नका . तासाभराने स्नान करा. 
 
15 प्राणायाम नेहमी आसन केल्यावर करा.
 
16 कोणतीही शारीरिक त्रास असल्यास योगा करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
17 योगा करताना काही त्रास वाढू लागत असल्यास किंवा नवीन समस्या उद्भवल्यास योगाभ्यास थांबवा. 
 
18 खाण्या -पिण्यात संयम बाळगा.

19 - गरोदरपणात एखाद्या योगगुरूच्या देखरेखी खाली योगाभ्यास करणे चांगले होईल.
 
20  योगासनांच्या शेवटी नेहमीच शवासन करावे.